झीलच्या पथनाट्याला सांगली व मिरज मध्ये उस्फुर्त प्रतिसाद;आयुक्तांची उपस्थिती
झील इंटरनॅशनल स्कूल, बामनोळी, सांगली च्या विद्यार्थ्यांनी सांगली व मिरज परिसरामध्ये दोन सत्रात पथनाट्य सादर केले. “पुरातन आणि आधुनिक जीवनशैलीतील” फरकावर प्रकाश टाकायचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे केला. आधुनिक जीवनशैलीचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होणाऱ्या विपरीत परिणामाबद्दल जनजागृती केली. मिरज येथील मिशन हॉस्पिटल चौक, लक्ष्मी मार्केट, हिरा चौक या ठिकाणी सकाळच्या सत्रात पथनाट्य सादर केले. सायंकाळच्या सत्रात सांगली येथील सोसायटी चौक, महालक्ष्मी चौक, विश्रामबाग व कापड मार्केट येथे सादरीकरण केले. कुपवाड येथील सोसायटी चौकाच्या पथनाट्या दरम्यान सांगली-मिरज-कुपवाड चे आयुक्त माननीय श्री नितीन कापडणीस साहेब यांच्यासह उपायुक्त माननीय श्री दत्तात्रय गायकवाड साहेब, प्रज्ञावंत कांबळे साहेब, महादेवी कुरणे मॅडम हे उपस्थित होते. आयुक्त साहेबांनी पथनाट्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी झील इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर माननीय श्री संजय महाडिक सर यांनी आयुक्त साहेबांचा सन्मान केला. यावेळी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर श्री विजय गीते सर कोऑर्डिनेटर सौ मेघाली नरगच्चे मॅडम यांच्यासह सहकारी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.